narayanbuwa kane

चला करू हरिकथा नाचू रंगू कीर्तनी,
देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी..

काणे बुवांनी अखिल भारतीय कीर्तन कुलासाठी लिहिलेले व संगीत दिलेले हे अखिल भारतीय कीर्तन कुलाचे घोषगीत म्हणजे बुवांच्या कीर्तन कारकिर्दीचेच नव्हे तर जणू जगण्याचेच ब्रीद ठरले. पूर्णेवेळ कीर्तनकारीता ती सुद्धा व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता करणाऱ्या काणे बुवांचा हा अखंड सेवा यज्ञ वयाच्या ८3 व्या वर्षी देह ठेवेपर्यंत अविरत सुरू होता.

कीर्तनकार घराण्याच्या ५ पिढ्यांचा वारसा बुवांना लाभला. वयाच्या १७ व्या वर्षी बुवांनी कीर्तन सेवेला सुरुवात केली. बुवांनी पहिलेच जाहिर कीर्तन सज्जन गडावर श्रीधर स्वामींच्या समोर उत्सवाच्या निमित्ताने सादर केले. श्रीधर स्वामींनी बुवांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून "मोठे व्हाल, मोठे व्हाल, मोठे व्हाल" असा ३ वेळा उच्चार करून आशिर्वाद दिला. पहिल्याच कीर्तनाला मिळालेल्या या आशिर्वादानंतर बुवांचे भाग्य उजळायचे होते. अक्कलकोट येथील गुरु मंदिरात गुरु पौर्णिमेच्या सप्ताहात बुवांच्या वडिलांची कीर्तने होत असत. एका वर्षी बुवांना तेथे जायचा योग आला. बुवांच्या भाग्यविधात्या सद्गुरुंनीच तो योग घडवून आणला होता. स्वामी समर्थावतार परम सद्गुरू श्री गजानन महाराजांची आणि बुवांची प्रथम भेट गुरुमंदिरातच झाली. अनेक जन्मांची ओळख पटली आणि बुवांच्याच शब्दात सांगायचे तर गुरुमाउलीने त्यांना कुशीत घेतले आणि कृपेचा अखंड वर्षाव सुरु झाला.

गुरुंचे कृपाशिर्वाद, पत्नी सुमतीबाई काणे यांची समर्थ साथ यामुळे बुवांच्या कार्याची दिशा स्पष्ट झाली. गुरु आज्ञेचे पालन, प्रखर तपाचरण व सेवेचा अखंड ध्यास यामुळे बुवांची संपूर्ण कीर्तन कारकीर्द आजच्या तरुण व येणाऱ्या सर्व कीर्तनकार पिढ्यांसाठी आदर्श ठरली आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार तसेच लोकसंग्रह या गुरु आज्ञेचे पालन बुवा अगदी तंतोतंतपणे करीत असत. अनेक साधकांच्या, प्रचारकांच्या प्रयत्नांमुळे आज अग्निहोत्राचे महत्व शास्त्रज्ञांनी देखील मान्य केले असून जगभरात त्याचा प्रसार होतो आहे. परंतु सुरुवातीच्या काळात बुवा कीर्तनात अग्निहोत्र सांगतात या गोष्टीला विरोध होत असे. अनेक ठिकाणी मानधन वाढवून देऊ पण अग्निहोत्र सांगू नये अशी आयोजकांची मागणी असे. अश्या ठिकाणी बुवांनी ठामपणे नकार देत कीर्तने नाकारली.

अनेक कीर्तन शिबिरांमधून बुवांनी विद्यार्थी घडवले आहेत व उत्तम कीर्तनकार तयार केले आहेत. घराण्याची परंपरा नातवंडां पर्यंत पोहोचवली आहे. "देह जावो अथवा राहो" अशी कार्याची तळमळ, "यथा चित्तं, तथा वाच:, यथा वाचस्तथा क्रिया" अशीच आहे. कीर्तनात खरे तेच सांगायचे हि गुरुंची आज्ञा, त्यामुळे ज्या कथा कीर्तनात सांगायच्या त्याचे आचरण स्वत: केले पाहिजे हि बुवांची तळमळ अनेक मंडळीनी जवळून पाहिली आहे.

कीर्तन कलेची परंपरा जपणाऱ्या काणे बुवांच्या कीर्तन सेवेची, गुरु भक्तीची निष्ठा या पुढील सर्व कीर्तनकार पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

कीर्तनाच्या सुरुवातीचे, दत्तभक्त अनंत वैद्य यांनी लिहिलेले व बुवांनी चाल बांधलेले "सद्गुरू नाथा तुझ्या कृपेचा" हे नमन अतिशय लोकप्रिय झाले आहे. कीर्तन म्हणजे काणे बुवा आणि काणे बुवा म्हणजे "सद्गुरू नाथा ..." हे समीकरण रूढ झाले आहे. "सद्गुरू नाथा ..." हे नमन आपण येथे ऐकू शकता:

 

कार्यक्रम

परमसद्गुरू श्री गजानन महाराज जन्मशताब्दी वर्ष (१७ मे २०१७-१८)
श्री महाराज जन्मकथा संकल्प भारत दौरा

बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.

संकल्प दौरा कीर्तने

  • क्र. ११४- श्री. महालक्ष्मी मंदीर, कल्याण
  • क्र. ११३- ज्येष्ठ नागरिक संघ, डोंबिवली
  • क्र. ११२- औरंगाबाद
  • क्र. १११- कोंडे, राजापूर
  • क्र. ११०- श्री. आपटे, गोवा
  • क्र. १०९- कराड
  • क्र. १०८- गजानन महाराज मंदिर, उज्जैन
  • क्र. १०७- श्री. रामनवमी उत्सव, आपटा
  • क्र. १०६- श्री. कुलकर्णी, पनवेल
  • क्र. १०५- गणपती मंदिर, डोंबिवली
  • क्र. १०४- हनुमान मंदीर, बदलापूर
  • क्र. १०३- वांगणी, बदलापूर
  • क्र. १०२- बदलापूर, श्री कुवळेकर
  • क्र. १०१- सोलगाव, राजापूर, रत्नागिरी
  • क्र. १००- विश्व अग्निहोत्र दिन समारोह, रत्नागिरी
  • क्र. ९९- श्री. घरत, गणेशपुरी
  • क्र. ९८- श्री. पटवर्धन, कल्याण
  • क्र. ९७- श्री. कौपिनेश्वर देवस्थान, ठाणे
  • क्र. ९६- श्री. गजानन महाराज मंदिर, डहाणू
  • क्र. ९५- वाकवली
  • क्र. ९४- शिवथरघळ
  • क्र. ९३- श्रीवर्धन
  • क्र. ९२- श्री. हरवंदे, महाड
  • क्र. ९१- तळा
  • क्र. ९०- गाणगापूर
  • क्र. ८९- सोनामाता विद्यालय, सोलापूर
  • क्र. ८८- हनुमान मंदिर, श्री. केळकर, नागपूर
  • क्र. ८७- रथसप्तमी उत्सव, श्री. कठाळे, नागपूर
  • क्र. ८६- श्री. काळकर, मुलुंड, मुंबई
  • क्र. ८५- मोरजी, गोवा
  • क्र. ८४- ब्रह्मदेव देवस्थान, ब्रह्माकरमळी, सत्तरी, गोवा
  • क्र. ८३- साखळी, गोवा
  • क्र. ८२- श्री योगेश्वरी देवी संस्थान, म्हापसा, गोवा
  • क्र. ८१- अग्नीहोत्र मंदिर, श्री. आपटे, म्हापसा, गोवा
  • क्र. ८०- शृंगेरी
  • क्र. ७९- दत्तमंदिर, ठाणे
  • क्र. ७८- बालाजी मंदिर, कल्याण
  • क्र. ७७- दत्तजयंती उत्सव, कवठेगुलंद
  • क्र. ७६- उपासनी बाबा आश्रम, साकोरी
  • क्र. ७५- श्री. साईबाबा देवस्थान, शिर्डी
  • क्र. ७४- श्री. मोरया गोसावी देवस्थान उत्सव, चिंचवड
  • क्र. ७३- गणेशवाडी
  • क्र. ७२- श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, पुणे
  • क्र. ७१- कुरुक्षेत्र
  • क्र. ७०- मथुरा
  • क्र. ६९- महाराष्ट्र भवन दिल्ली
  • क्र. ६८- हृषिकेश (संगम)
  • क्र. ६७- हरिद्वार
  • क्र. ६६- गया
  • क्र. ६५- बुद्धगया
  • क्र. ६४- प्रयाग (त्रिवेणी संगम)
  • क्र. ६३- काशी
  • क्र. ६२- अयोध्या
  • क्र. ६१- सोनामाता मंदिर, सिद्धपुर (मातृगया), गुजरात
  • क्र. ६०- साईमंदिर, भद्रा, अहमदाबाद
  • क्र. ५९- दत्तमंदिर, चांदखेडा, अहमदाबाद
  • क्र. ५८- श्री गिरनार पर्वत पायथा, जुनागड
  • क्र. ५७- प्रभास तीर्थ क्षेत्र, गुजरात
  • क्र. ५६- सोमनाथ मंदीर, गुजरात
  • क्र. ५५- द्वारका, गुजरात
  • क्र. ५४- बेट द्वारका, गुजरात
  • क्र. ५३- नारेश्वर, गुजरात
  • क्र. ५२- गरुडेश्वर, गुजरात
  • क्र. ५१- दहेज, गुजरात
  • क्र. ५०- बडोदा
  • क्र. ४९- श्री परशुराम मंदिर, संगम माहुली, सातारा
  • क्र. ४८- लईराई देवीसंस्थान, शिरगाव, गोवा
  • क्र. ४७- दत्तमंदिर, भोर, महाराष्ट्र
  • क्र. ४६- ब्रह्मानंद स्वामी मठ, कागवाड, महाराष्ट्र
  • क्र. ४५- कवठेगुलंद, कन्यागत महापर्वकाळ समाप्ती उत्सव
  • क्र. ४४- विठ्ठल मंदिर, गणेशवाडी
  • क्र. ४३- चिकुरडे, सांगली
  • क्र. ४२- रावेर, जामखंडी, बेळगाव
  • क्र. ४१- ढोल्या गणपती मंदिर, वाई
  • क्र. ४० कागवाड
  • क्र. ३९ मिरज किल्ला भाग
  • क्र. ३८ दड्डी
  • क्र. ३७ वरणगे पाडळी
  • क्र. ३६ पट्टणकोडोली
  • क्र. ३५ चिपळूण
  • क्र. ३४ श्री क्षेत्र परशुराम
  • क्र. ३३ गणपतीपुळे
  • क्र. ३२ संगमेश्वर
  • क्र. ३१ देवरुख
  • क्र. ३० साखरपा
  • क्र. २९ रत्नागिरी
  • क्र. २८ श्री परशुराम मंदिर, बाणगंगा, वाळकेश्वर, मुंबई
  • क्र. २७ सौरभ कार्यालय बावधन पुणे
  • क्र. २६ श्री राममहाराज भक्तमंडळी, रंकाळा संध्यामठ कोल्हापूर
  • क्र. २५ गुरुमंदिर, अक्कलकोट
  • क्र. २४ सोलापूर
  • क्र. २३ वाघोली
  • क्र. २२ मंगळवेढा
  • क्र. २१ पंढरपूर
  • क्र. २० खर्डी
  • क्र. १९ सांगोला
  • क्र. १८ कुची
  • क्र. १७ मिरज
  • क्र. १६ सांगली
  • क्र. १५ बालाजी मंदिर नागपूर
  • क्र. १४ गजानन महाराज मंदिर, महाल, नागपूर
  • क्र. १३ नागपूर
  • क्र. १२ मुर्तीजापूर (बाळप्पा मठ)
  • क्र. ११ कारंजा (दत्त जन्मस्थान)
  • क्र. १० अमरावती
  • क्र. ९ काटोल (चंडिका मंदिर)
  • क्र. ८ नागपूर (मानेगाव दत्तमंदिर)
  • क्र. ७ अमरकंटक
  • क्र. ६ रायपूर
  • क्र. ५ राजीम (राजीव लोचन मंदिर)
  • क्र. ४ बिलासपूर गजानन महाराज मंदिर
  • क्र. ३ बेल्लूर मठ कलकत्ता
  • क्र. २ दक्षिणेश्वर मठ कलकत्ता
  • क्र. १ खरगपूर (श्रींचे जन्मस्थान)