mandir

श्री दत्त मंदिर
कवठे गुलंद, नरसोबावाडी जवळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र

नम्र आवाहन

श्री क्षेत्र नरसोबाची वाडी पासून साधारण 6 कि. मी. अंतर असलेल्या कवठे गुलंद या ठिकाणी परमसद्गुरू श्री. गजानन महाराज ( शिवपुरी, अक्कलकोट ) यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय ह. भ. प. नारायणबुवा काणे ह्यांनी या मंदिराची निर्मिती १९८३ साली केली. प्रत्यक्ष परमसदगुरूंच्या हस्ते मंदिरातील अत्यंत जागृत अश्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्ती ची स्थापना तसेच अग्निमंदिराची स्थापना १९८३ साली या ठिकाणी झाली. मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी स्वत: परम सद्गुरूंच्या पूजेत काही दिवस हि मूर्ती होती. स्वत: परमसद्गुरूंचा पदस्पर्श व आशीर्वाद या क्षेत्राला लाभला आहे. श्री प्रतिपादित अग्निहोत्र प्रचार, गोसेवा अशी श्रींना अभिप्रेत असलेली कार्ये येथून चालू आहेत.

मंदिर बांधुन आता जवळजवळ चाळीस वर्षे झाली असून त्या अनुषंगाने मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. या स्ट्रक्चरल ऑडिट च्या रिपोर्ट नुसार मंदिराचे आयुष्य फारतर दोन ते तीन वर्षांचे राहीले आहे. वापरासाठी अयोग्य असा शेरा त्यात दिला गेला आहे. त्यामुळे मंदिराची पुनर्बाधणी आवश्यक झाली आहे. या कार्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे.

सर्व सद्भक्तांना या पवित्र कार्यात सढळ हस्ते सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत...
आपला सहभाग आमच्यासाठी अमुल्य आहे !!!

श्री दत्त मंदिर व परिसर

सध्याची दुरावस्था

मूळ पूर्वीच्या सुयोग्य स्थितितील छायाचित्रे

पूर्वीचा सुयोग्य स्थितितील सभामंडप

श्री श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती

परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या बुवांना मिळालेल्या प्रसाद पादुका

अग्निमंदिर

गोसेवा

मंदिरातील उत्सव

प्रस्तावित प्रकल्प

मंदिर जीर्णोद्धार

अग्निमंदिराची दुरुस्ती व डागडुजी

गोशाळेचे extension

परिसराचे सुशोभिकरण

अग्निहोत्र प्रचार, प्रसारा संबंधित कार्यक्रमांच्या नियोजनाच्या दृष्टीने जागेची उपलब्धी

सर्वात प्रामुख्याने आर्थिक सहकार्य अपेक्षित आहे. या पवित्र कार्यात आपण कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ शकत असाल तर कृपया संपर्क करा:
श्री विनय केळकर - ७२१८४२९७७०

मंदिरातील नित्य सेवा, अभिषेक व उत्सवात आपण सहभागी होऊ शकता. या पवित्र कार्यात आपले योगदान अमूल्य आहे.

प्रस्तावित खर्च

प्रस्तावित अंदाजे खर्च: रु. २२,००,०००/- रु. बावीस लाख

QRCode for Online Donation

आर्थिक सहकार्य करण्यासाठी

payment details

Account Name:
SHRISANKET BHARGAV KANE
Bank Name:- ICICI BANK, Ganeshwadi Branch
Account Number:- 640101501137
IFSC Code:- ICIC0006401
Google Pay number : 7721022568
UPI id : shrisanketkane.sk-1@okicici